devendra fadavnis on sushilkumar shinde | Sarkarnama

सुशीलकुमार शिंदे यांनी केलेले वक्तव्य अगदी योग्य!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

मंगळवेढ्यातील संत दामाजी आणि बसवेश्‍वर महाराजांच्या स्मारकाचे काम सुरू होईल. त्यासाठी आवश्‍यक तो निधी आणि पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे त्याची चिंता करू नका - देवेंद्र फडणवीस

सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळ कायमस्वरुपी हटवण्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना महत्त्वाची आहे आणि ती आम्ही राबवणारच, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १०) मंगळवेढा येथे दिले. 

भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारासाठी आयोजित मंगळवेढ्यातील प्रचारसभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, उमेदवार सुधाकर परिचारक, माजी आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘विरोधी पक्ष आज गलितगात्र झाला आहे. त्यांना काय करावं, हे कळेनासं झालं आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी केलेले वक्तव्य अगदी योग्य आणि वस्तुस्थितीला धरुन आहे की आम्ही आता पार थकलो आहोत. त्यामुळेच आमच्याशी लढण्यासाठी विरोधकच राहिला नाही.’’ 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख