भेगडेंना दुप्पट मतांनी निवडून दिले तर त्यांना कॅबिनेटमंत्रीपद!

छत्रपतींचा मी मावळा असून गद्दारी कोणाच्या रक्तात आहे हे मतदारांना विरोधी उमेदवारी वरून दिसून आले आहे, असे भेगडे म्हणाले. रोजगार आणि पर्यटन याकरिता पुढील काळात प्राधान्यने काम करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
भेगडेंना दुप्पट मतांनी निवडून दिले तर त्यांना कॅबिनेटमंत्रीपद!

पिंपरी (पुणे) : मागच्यापेक्षा यावेळी बाळा भेगडेंना दुप्पट मतांनी निवडून दिले, तर त्यांना राज्यमंत्री पदावरून बढती देऊन कॅबिनेटमंत्री करतो, असे जाहीर आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मावळवासियांना दिले. तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

राज्यमंत्री आणि मावळ विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार संजय उर्फ बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार दिगंबर भेगडे, रुपलेखा ढोरे, रवींद्र भेगडे, संतोष दाभाडे आदी व्यासपीठावर  होते.  कात्रज दूध संघाचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) संचालक बाळासाहेब नेवाळे आणि पंचायत समितीचे दत्ता शेवाळे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केला. 

15 वर्ष सत्तेत असताना आघाडीने केवळ भ्रष्टाचार केला आणि स्वतःची कमाई केली आहे. त्यांनी या 15 वर्षाचा हिशोब द्यावा. मी पाच वर्षांचा हिशोब देतो, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. वेगवेगळ्या कंपन्या येत असल्याने प्रत्येकाला रोजगार मिळेल. एक कोटी लोकांना पुढील पाच वर्षात रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. एक कोटी परिवार बचत गटाशी जोडणार असून त्यांच्या उत्पादनाचे मार्केटिंग केले जाईल.त्याव्दारे महिलांना रोजगार मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com