संताजी धनाजीप्रमाणे झोपेतही त्यांना मोदी दिसतात!

मोदींनी अतिरेक्यांसह पाकिस्तानला अद्दल घडविली.
संताजी धनाजीप्रमाणे झोपेतही त्यांना मोदी दिसतात!

श्रीरामपूर (जि. नगर) : काँग्रेसने साठ वर्षात जी कामे केली नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात केली. काँग्रेस व मोदी यांच्या कामांची तुलनाच होऊ शकत नाही. मोदींच्या कामामुळे काँग्रेसवाल्यांची झोप उडाली असून, संताजी धनाजीप्रमाणे झोपेतही त्यांना मोदी दिसत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लाखंडे यांच्या प्रचारार्थ येथील थत्ते मैदानावर झालेल्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. विधानसभेचे उपसभापती विजय औटी, जलसंपदामंत्री गिरिश महाजन, पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, विनायक राऊत, आमदार बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, डॉ. सुजय विखे, व्यासपीठावर होते.

ते म्हणाले, मोदी खऱ्या अर्थाने गरिबांसाठी लढले. जनधन ओजनेअंतर्गत ३४ हजार कोटी कुटुंबाचे बॅंकेत खाते उघडून गोरगरिबांच्या खात्यात ८० हजार कोटी रुपये दिले. स्वच्छ भारत योजनेतून शौचालये दिली. पाच वर्षात ४५ टक्क्यांवरून ९८ टक्के घरात शौचालये झाली. उज्वला योजनेतून १३ हजार कोटी घरात मोफत गॅस सिलेंडर दिले. घरकुल योजनेतुन गरिबांना घराच्या चाव्या दिल्या. अनुदाने बॅंक खात्यात जमा करून भ्रष्टाचारी व्यवस्था तोडण्याचे काम केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com