devendra fadavnis speech in phaltan rally | Sarkarnama

फलटणला सभा घेतली की यश मिळते : फडणवीस

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

बारामतीकरांनी फलटणकरांचे पाणी आणि रेल्वे अडविली होती. मात्र, आम्ही ते सर्व परत मिळवून दिले आहे.

सातारा : लोकसभा निवडणुकीत तुम्ही रणजितसिंहांच्या रूपाने आम्हाला थेट इंजिन दिल्याने फलटणच्या विकासाची गाडी वेगाने धावायला लागली. आता दुसरे इंजिन आमदारकीच्या रूपाने द्या. आम्ही त्याला पेट्रोल आणि इलेक्‍ट्रिसिटी पुरवू. त्यामुळे फलटणच्या विकासाची गाडी भरधाव वेगाने धावेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

भाजप उमेदवार दिगंबर आगवणे यांच्या प्रचारार्थ फलटणच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, जयकुमार गोरे, विक्रम पावसकर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, फलटणला सभा घेतली की यश मिळते. लोकसभेला येथे सभा घेतली आणि तुमच्या सर्वांचा जोश पाहून मला रणजितसिंह निंबाळकर निवडुन येतील, असे वाटले होते. ते खरे ठरले, आजचा तुमचा जोश पाहून पुन्हा एकदा मला विश्‍वास निर्माण झाला आहे, येथे युतीचाच आमदार निवडुन येईल. फलटण मतदारसंघाचा आमदार दिगंबर आगवणेच होईल, दुसरा कोणी होणार नाही.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख