राम शिंदेंना जेवढे मताधिक्य, तेवढे मोठे खाते देणार!

आता त्यांनी लोकांच्यात जावं ते सत्ता मिळावी म्हणून नाही तर किमान विरोधीपक्ष नेतेपद तरी मिळावं म्हणून ...
राम शिंदेंना जेवढे मताधिक्य, तेवढे मोठे खाते देणार!

जामखेड (जि. नगर): काँग्रेस राष्ट्रवादीने गेल्या पाच वर्षात चार यात्रा काढल्या पण त्यांच्या यात्रेला लोक जमत नाहीत. त्यांना माणसं गोळा करावी लागतात. पंधरा वर्षाच्या सत्तेच्या काळात त्यांनी माजोरीपणा केला म्हणून त्यांच्यावर वाईट वेळ आली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महाजनादेश यात्रा जामखेड येथे आल्यावर फडणवीस बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पणन मंत्री राम शिंदे, खासदार सुजय विखे, खासदार प्रितम मुंडे उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले,"काँग्रेस राष्ट्रवादीवाले जनतेला विसरले. सत्तेत होते तेव्हा जनतेत जावं त्यांच्याशी संवाद करावा असं त्यांना वाटलं नाही. सत्ता गेल्यावर मात्र त्यांना जनता आठवली. मग ते वेगवेगळ्या यात्रा घेऊन जनतेत येऊ लागले आहेत पण लोक त्यांना दाद देत नाहीत. त्यांना माणसं गोळा करावी लागत आहेत. विरोधी पक्षाची एवढी वाईट अवस्था झाली आहे त्यांना विरोधीपक्षनेतेपदसुद्धा मिळालेले नाही. त्यांनी आता यात्रा काढावी ते किमान विरोधीपक्षनेते पद मिळावे म्हणून ... त्यांना सत्ता मिळणार नाही."

"राम शिंदे यांना कर्जत जामखेडच्या जनतेने मोठ्या मतांनी निवडून दयावे. त्यांना मी पुन्हा मंत्री करणार आहे. तुम्ही त्यांना जेवढे जास्त मताधिक्य द्याल तेवढे मोठे खाते त्यांना मिळेल. राम शिंदे गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले आहेत. त्यांनी या भागात जलसंधारणाची कामे करून इथल्या लोकांना दिलासा दिला आहे "असे फडणवीस म्हणाले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com