राळेगणसिद्धी, हिवरेबाजारप्रमाणे दोन हजार गावे 'मॉडेल व्हिलेज' केली!

न्हा आम्हीच सत्तेत येणार.
राळेगणसिद्धी, हिवरेबाजारप्रमाणे दोन हजार गावे 'मॉडेल व्हिलेज' केली!

शिर्डी (नगर) : " ग्रामीण महाराष्ट्रात गेल्या सत्तर वर्षांत झाले नाही एवढे काम चार वर्षांत केले. हा तर ट्रेलर आहे; पिक्‍चर अभी बाकी है. पुन्हा आम्हीच सत्तेत येणार. गावांचे उर्वरित प्रश्‍न सोडविणार. सरपंचांचे मानधन तिपटीने वाढविले. तुम्हाला तिप्पट दिले, आता तुम्ही आम्हाला तिप्पट द्या,'' असे आवाहन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यव्यापी सरपंच व उपसरपंच परिषदेच्या व्यासपीठावरून विधानसभा निवडणुकीचा बिगूल फुंकला. 

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील आदी उपस्थित होते. राज्यभरातील चाळीस हजारांहून अधिक सरपंच व उपसरपंच या परिषदेत सहभागी झाले होते. 

फडणवीस म्हणाले,"सबका मालिक एक, श्रद्धा व सबुरी अशी शिकवण देणाऱ्या साईंच्या भूमीत मुद्दाम ही महापरिषद घेतली. आपल्या सर्वांचा मालिक एकच, तो म्हणजे मतदार. विकासकामांवर श्रद्धा ठेवा. जो गाव सांभाळतो, तो देशही सांभाळू शकतो. त्यासाठी सबुरी ठेवा. राळेगणसिद्धी व हिवरेबाजारप्रमाणे आता राज्यात दोन हजार गावे "मॉडेल व्हिलेज' झाली. हे पाच वर्षांतील फार मोठे यश आहे. या यशाचे शिल्पकार सरपंच आहेत. जिल्हा नियोजन समितीवर सरपंचांना प्रतिनिधित्व देऊ, त्यांच्यासाठी पुरस्कार सुरू करू. पंधराव्या वित्त आयोगाबाबत सरपंच प्रतिनिधींशी चर्चा घडवून आणू.''  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com