devendra fadavnis is not my brother
devendra fadavnis is not my brother

देवेंद्र फडणवीस भाऊ नाहीत; 'भाऊ' म्हटले की भीती वाटते! 

देवेंद्र फडणवीस यांनी काल 'एबीपी माझा'वर झालेल्या मुलाखतीत पंकजा या बहिणासारख्या असल्याचे म्हटले होते. त्याला पंकजा यांचे आजचे विधान हे उत्तर मानले जात आहे.

पुणे: उद्धव ठाकरे आणि महादेव जानकर हे मुंडेसाहेब हयात असतानाचे भाऊ आहेत. त्यानंतरच्या काळात कुणाला 'भाऊ' मानलेले नाही. कारण 'भाऊ' म्हटले की मला भीती वाटते, अशी टिप्पण्णी माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. 

गोपीनाथगडावरील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी भाजपपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भाने पंकजा मुंडे 'एबीपी माझा'शी बोलत होत्या. पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीसांचे एका शब्दात वर्णन करण्यास सांगण्यात आले होते. त्यावर फडणवीसांचा 'मित्र' असा उल्लेख पंकजा यांनी केला. त्याला जोडून पंकजा म्हणाल्या, आता कुणाला भाऊ, बहिण म्हणू वाटत नाही. कारण 'भाऊ' म्हटले की मला भीती वाटते. उद्धव ठाकरे, महादेव जानकर यांना मुंडेसाहेब हयात असतानाच 'भाऊ' मानल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com