जयंत पाटील यांच्या भाषणाला पाच लोकही थांबत नाहीत!

पेठनाका येथे महाडिक परिवाराच्या परंपरेला साजेशी तलवार देऊन राहुल महाडिक व सम्राट महाडिक या दोघा बंधूंनी मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत केले.
जयंत पाटील यांच्या भाषणाला पाच लोकही थांबत नाहीत!

इस्लामपूर (सांगली) : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणाला पाच लोकही थांबत नाहीत, त्यांना अमोल कोल्हेच्या क्रेझचा आधार घ्यावा लागत आहे. याउलट आमच्या महाजनादेश यात्रेलामैदाने पुरत नाहीत आणि राष्ट्रवादीच्या यात्रेला छोटी मंगल कार्यालयेदेखील भरत नाहीत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाणला.

आज इस्लामपूर येथे भाजपाच्या महाजनादेश यात्रेनिमित्ताने  आयोजित सभेत ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मंत्री सुरेश खाडे, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार पृथ्वीराज देशमुख,आमदार निरंजन डावखरे, भगवानराव साळुंखे, तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, विक्रम पाटील, शिवाजी पवार, धैर्यशील मोरे प्रमुख उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "जयंत पाटील यांचे भाषण सुरू झाल्यावर लोक थांबत नाहीत, जयंत पाटलांना अमोल कोल्हेच्या आधी भाषण करावे लागते. कोल्हेंना पाहण्यासाठी कार्यकर्ते गर्दी करतात. विरोधी पक्षांचा जनाधार कमी झाला आहे.   

नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी भाषणात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत, तुमचा आशीर्वाद असेल तर 'त्यांचा करेक्ट कार्यक्रम' करू, असे म्हणत आपली जयंत पाटील यांच्याविरोधात लढायची तयारी झाल्याचे दाखवून दिले. तर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राप्रमाणे राज्यातही सरकार येणार आहे, यामुळे आता मला, चंद्रकांत दादा, सदाभाऊ व निशिकांत दादांना आशीर्वाद द्या, असे आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com