devendra fadavnis campain in nevasa | Sarkarnama

भ्रष्टाचाराचा एकही ठपका आमच्यावर नाही : फडणवीस

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

एक हजार कोटींच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला आचारसंहिता संपल्यावर तत्काळ मंजुरी देण्यात येईल.

नेवासे (नगर) : "ज्ञानेश्वर मंदिर, शनिशिंगणापूरसह तालुक्‍यातील तीर्थक्षेत्रांच्या एक हजार कोटींच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला आचारसंहिता संपल्यावर तत्काळ मंजुरी देण्यात येईल,'' असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

भाजपचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारार्थ नेवासे फाटा येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे व डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, भाजप नेते अभय आगरकर, शिवसेनेचे मच्छिंद्र म्हस्के, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष नीरज नांगरे, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, "गेल्या पाच वर्षांत भाजप- मित्रपक्षांच्या सरकारने राज्यात प्रामाणिकपणे कामे केली. हे काम करीत असताना भ्रष्टाचाराचा एकही ठपका आमच्यावर नाही. बेलापूर-परळी रेल्वेमार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. नेवासे तालुक्‍यातील ज्ञानेश्वर मंदिर, श्रीक्षेत्र देवगड, शनिशिंगणापूर, म्हाळसादेवी या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज बलशाली भारताची निर्मिती होत आहे.''

आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी प्रास्ताविक केले. आमदार मुरकुटे, अशोक गायकवाड, अंबादास कोरडे, रशीद इनामदार, अंकुश काळे यांचीही भाषणे झाली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख