devendra fadavnis on assembly election | Sarkarnama

विधानसभेची केवळ औपचारिकता : मुख्यमंत्री 

अल्ताफ शेख
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांना पुढील ४० वर्षे विरोधी पक्षात राहावे लागणार

-देवेंद्र फडणवीस

अकोले (नगर) :  महाजनादेश यात्रेला राज्यात जनतेचा आदेश मिळाला असून, निवडणुकीची फक्त औपचारिकता बाकी राहिली असल्याचा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज अकोले येथून सुरूवात झाली.  अकोले येथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकर पिचड होते.  या वेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आमदार सुरजितसिंह ठाकूर, वैभव पिचड, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे,  शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत ज्यांचे नाव आहे, असे जेष्ठ माजी मंत्री मधुकरराव पिचड व पाच वर्षे आमच्या बरोबर विधानसभेत शांत राहून अभ्यासपूर्ण मुद्दे मांडणारे वैभव पिचड भाजपात आलेत, याचा मनस्वी आनंद आहे. 2021 पर्यत महाराष्ट्रात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही व  धुरमुक्त, चुल मुक्त महाराष्ट्र करणार आहोत. अकोले तालुक्यात रस्त्यांची कामे करून येत्या दोन वर्षात एकही रस्ता खराब दिसणार राहणार नाही.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख