devendra fadavnis appointed as acting chief minister | Sarkarnama

राजीनामा दिला असला तरी देवेंद्र फडणवीस 'माजी' झालेले नाहीत!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

राज्यपाल सांगतील त्याप्रमाणे फडणवीसांना पुढील कार्यवाही करावी लागणार आहे.

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर सोशल मिडीयावर 'माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस' असा ट्रेंड सुरू झाला आहे, मात्र प्रत्यक्षात फडणवीस हे माजी मुख्यमंत्री अजून बनलेले नाहीत. ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत.

आज दुपारी 4.10 च्या सुमारास फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राजीनामा दिला. कोश्यारी यांनी तो तातडीने स्विकारला. त्यानंतर यासंबंधीची माहिती फडणवीस यांनी पत्रकारांना दिली. पुढील पर्यायी व्यवस्था होईपर्यत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करायला राज्यपालांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे काम करणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख