वांबोरी चारीसाठी 100 कोटी देणार:  मुख्यमंत्री  - devendra fadavnis announce budget for wambori | Politics Marathi News - Sarkarnama

वांबोरी चारीसाठी 100 कोटी देणार:  मुख्यमंत्री 

विलास कुलकर्णी
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

राज्य दुष्काळमुक्त करायचे आहे. त्यासाठी कोकणातील वाहून जाणारे पाणी वळवायचे आहे. 

राहुरी (नगर) : आघाडी सरकारने पंधरा वर्षांत जेवढी विकास कामे केली, त्याच्या दुप्पट विकासकामे मागील पाच वर्षात केली. निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी 1200 कोटी रुपये निधी दिला. वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामासाठी 100 कोटी देऊ. राहुरी नगरपालिकेच्या सुधारित 29 कोटी रुपयांच्या पाणी योजनेसाठी मंजुरी दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राहुरी येथे महाजनादेश यात्रा प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर कदम, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार वैभव पिचड, बबनराव पाचपुते, शिवाजी सोनवणे, चाचा तनपुरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "शेवटचा शेतकरी कर्ज माफीत येत नाही, तोपर्यंत योजना बंद होणार नाही. राज्यात अठरा हजार गावांत पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या. मुख्यमंत्री सडक योजनेतून ग्रामीण भागात तीस हजार किलोमीटरचे रस्ते केले. वीस हजार किलोमीटरचे राष्ट्रीय व दहा हजार किलोमीटरचे राज्यमार्ग केले. नगर जिल्ह्यात पाच वर्षात मुख्यमंत्री सडक योजनेतून १४१० किलोमीटर रस्ते केले. आगामी पाच वर्षात प्रत्येक शाळा डिजिटल करायच्या आहेत. शिक्षण क्षेत्रात देशात अव्वल स्थानी यायचे आहे. राज्य दुष्काळमुक्त करायचे आहे. त्यासाठी कोकणातील वाहून जाणारे पाणी वळवायचे आहे. .
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख