'उरी'पेक्षा मोठा बदला घेणार: फडणवीस 

प्रकृतीच्या कारणाने भाषणातील आवाजाची उंची त्यांनी मर्यादित राखली.
'उरी'पेक्षा मोठा बदला घेणार: फडणवीस 

तासगाव (सांगली): ''पाकिस्तान भिकारी देश आहे. इम्रान खान जगभर हातात कटोरा घेऊन भीक मागत फिरतोय आणि इकडे आगळीक करतोय. त्यांना त्यांची औकात दाखवण्याची वेळ आली आहे. उरीमध्ये हल्ला केल्यानंतर पाकिस्तानात घुसून आपण मारले आणि त्याहून मोठा बदला घेतला जाईल. हे सरकार हल्ल्याचा केवळ निषेध करून बघत बसणारे नाही'', अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हल्लाबोल केला. 

पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. या कुटुंबियांसोबत सारा भारत देश उभा आहे. त्यांना आम्ही आधार देऊ, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. तासगाव (जि. सांगली) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा अनावरण सोहळ्यात ते होते. व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, विलासराव जगताप, सुमन पाटील, अनिल बाबर होते. खासदार संजय पाटील यांनी हा सोहळा आयोजित केला होता. 

काल पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 44 जवान हुतात्मा झाले. त्या पार्श्‍वभूमीवर हा कार्यक्रम होत असलेल्या डामडौल, सत्कार टाळण्यात आले होते. काल प्रकृतीच्या कारणाने विदर्भ दौरा अर्ध्यावर सोडून मुंबईला परतलेले मुख्यमंत्री तासगावमध्ये येणार का, याचीच उत्सुकता जास्त होती. ते आले, मात्र प्रकृतीच्या कारणाने भाषणातील आवाजाची उंची त्यांनी मर्यादित राखली. तरीही पाकिस्तानवर हल्लाबोल करताना त्यांच्यातील आक्रमकता दिसून येत होती. ते म्हणाले, "सारा देश उद्विग्न आहे. आम्ही पेटलेलो आहोत. मनात प्रचंड राग आहे. पाकने भ्याड हल्ला केला आहे. या दुष्कृत्याचा निषेध आहे. हुत्मात्म्यांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण सव्वाशे कोटी भारतीय उभे आहेत. 44 जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे पंतप्रधानांनी ठणकावले आहे. अब जो नगाडा बजा है सीमावर शैतान का, नक्षे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का... हा भिकारी देश, भीक मागत फिरतो. इम्रान खान कटोरा घेऊन फिरतो. इकडे आगळीक करतो. आता वेळ आली आहे, त्यांना औकात दाखवून द्यायची.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com