devendra fadavnis aashta tour | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांना आष्ट्यात येवू देणार नाही; मराठा समाजाचा ठराव! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

सांगली : आष्टा (ता. वाळवा) येथील अतिरिक्त तहसील कार्यालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमासाठी शुक्रवारी (ता 27 ) येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोणत्याही मंत्र्याला वाळवा तालुक्‍यात पाय ठेवू द्यायचा नाही , असा ठराव आज मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. 

अनेक वर्षांपासून मागणी असलेले अतिरिक्‍त तहसिल कार्यालय आष्ट्यात करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमासाठी फडणवीस येणार आहेत. त्या कार्यक्रमाची तयारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत करत होते. या कार्यक्रमात राजकीय टिकाटिप्पण्णी होण्याची शक्‍यता होती. मात्र मराठा समाजाने विरोधाची भूमिका घेतल्याने कार्यक्रम रद्द होण्याची शक्‍यता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख