'कागल' भाजपकडे अन समरजितसिंहच उमेदवार; फडणवीसांची घोषणा! 

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर श्री. घाटगे यांनी एकच जल्लोष केला.
'कागल' भाजपकडे अन समरजितसिंहच उमेदवार; फडणवीसांची घोषणा! 

कोल्हापूर : एकीकडे शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी कागलची जागा शिवसेनेकडेच राहणार असे जाहीर केले असतानाच त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच तालुक्‍यात या जागेवर भाजपाचाच उमेदवार असेल आणि समरजितसिंह घाटगे हेच उमेदवार असतील अशी घोषणा केल्याने युतीत जागेवरून चढाओढ असल्याचे स्पष्ट झाले.

कागल येथे आज जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अंबरिश घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार संजय घाटगे गटाचा मेळावा झाला. गैबी चौकात झालेल्या या मेळाव्यात खासदार मंडलिक यांनी ही जागा शिवसेनेचीच असेल आपण ती पक्षप्रमुखांना सांगून मागून घेऊ तुम्ही तयारी लागा असे श्री. घाटगे यांना सांगितले आहे.

दुसरीकडे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस आज कोल्हापुरात होते. त्यांची महाजनादेश यात्रा कोल्हापूरमार्गे मुदाळ तिट्टा व तेथून राधानगरीमार्गे कणकवलीकडे रवाना झाली. मुदाळ तिट्टा येथे या यात्रेत "म्हाडा'चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हेही मुख्यमंत्र्यांच्या रथात सहभागी झाले. मुदाळ तिट्टा येथे झालेल्या सभेत श्री. फडणवीस यांनी समरजितसिंह यांचे काम चांगले असून गेल्या पाच वर्षात त्यांनी या मतदार संघात चांगले काम केल्याचे सांगितले. त्यामुळे कागलचा उमेदवार हा भाजपाचाच असेल आणि समरजितसिंह हेच उमेदवार असल्याचे श्री. फडणवीस यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर श्री. घाटगे यांनी एकच जल्लोष केला.

कागलच्या जागेवरून जिल्ह्यातच युतीत खडाखडी सुरू आहे. पुर्वीपासून ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे, एका निवडणुकीत माजी आमदार संजय घाटगे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजयही मिळवला होता. त्यामुळे या निवडणुकीत ही जागा कोणाकडे जाणार याविषयी उत्सुकता आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com