मुख्यमंत्र्यांनी करण पवारांना 'आशिर्वाद' देताच सेनेचे चिमणराव अस्वस्थ ! 

युतीच्या जागा वाटपात पारोळ्याची जागा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील हे विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत.
Parola politics :CM-Karan-pawar-Chintamanrao Patil
Parola politics :CM-Karan-pawar-Chintamanrao Patil

पारोळा(जि.जळगाव) : महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने कार्यक्रम पत्रिकेत नसतानाही मुख्यमंत्र्यांचा ताफा बराच वेळ पारोळ्यात स्थिरावला, आणि त्यात करण पवार यांना आशीर्वाद द्या, असे पारोळ्यातील जनतेला आवाहन करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे जळगावकडे रवानाही झाले.

पण या आशिर्वादामुळे शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ झाले .  शुक्रवारी दिवसभर राजकीय निरीक्षकांमध्ये याच गोष्टीची  चर्चा होती. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या करण पवार यांच्या संदर्भातील विधानाला अनेक पैलू आहेत. युतीच्या जागा वाटपात पारोळ्याची जागा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील हे विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी चिमण आबांच्या संपर्क कार्यालयात जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आबा तुम्ही काही काळजी करु नका, वेळ आली तर करणला शांत बसवू, असे म्हटले होते.

 करण पवार गिरीश महाजन यांच्या अत्यंत विश्वासू युवा सहकाऱ्यांपैकी एक गणले जातात. ज्या पद्धतीने लोकसभेला उन्मेष पाटील यांची ऐनवेळी एंट्री झाली, तशाच पद्धतीने करण पवार यांच्या संदर्भात पारोळ्यात चित्र निर्माण होऊ शकते. मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य त्याचेच द्योतक मानले जात आहे. शिवाय करण पवार जर भाजपाचे उमेदवार असतील तर मग शिवसेनेचे काय...हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. 

पारोळ्याला मुख्यमंत्र्यानी दिले महत्त्व म्हणजे आगामी काळातील बदलाची नांदी मानावी का, असाही प्रश्न आता पारोळा-एरंडोल विधानसभेत निर्माण झालेला आहे. या प्रश्नाची उत्तरे मात्र काळाच्या उदरात लपलेली आहेत. 
.
पुन्हा भेटीला येणार -मुख्यमंत्री 
पारोळ्याच्या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण सरकारने दिल्याचे ठासून सांगितले. यावेळी शहरात झालेल्या स्वागताचे कौतुक करत पुन्हा आपल्या भेटीला नक्की येणार असे सांगताच, टाळ्यांचा कडकडाट झाला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या घोषणांनाही यात्रेत चांगला प्रतिसाद मिळाला.

खा.उन्मेश पाटील, नगराध्यक्ष करण पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, आ. स्मिता वाघ, जि. प. अध्यक्ष उज्ज्ववा पाटील, पं. स. सदस्या सुजाता पवार, महिला बालकल्याण समिती सभापती अंजली पवार, शहर विकास आघाडीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे व पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com