devendra fadanvise | Sarkarnama

मुंबईत मेट्रो 7 चे मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्‌घाटन, शिवसेना मात्र दूर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

मुंबई : पश्‍चिम उपनगरातील मालाड पठाणवाडी येथील पश्‍चिम द्रुतगती मार्गावर उभारण्यात येणाऱ्या मेट्रो 7 च्या गर्डर उभारणीचे काम बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित पार पडले. एरवीही एखादा भूमिपूजनाचा कार्यक्रम असतो, त्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींचा लवाजमा असतो. मुख्यमंत्र्यांनी वन मॅन आर्मीची झलक दाखवत, पश्‍चिम उपनगरातील सेनेचे मंत्र्यांना मेट्रो 7च्या कामापासून दूर ठेवल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या खेळीने सेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून, सत्तेत राहून फायदा काय ? असा सवाल सेनेच्या एका नेत्याने केली. 

भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर मेट्रो 7 च्या प्रकल्पाची 2016 साली घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे या कामाचे श्रेय पूर्णपणे भाजपाला मिळण्याचा फडणवीस यांच्याकडून प्रयत्न केला गेला आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बरोबरीचे नगरसेवकांचे संख्याबळ आणण्यात भाजपाला यश मिळाल्यामुळे, 2019 होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुंबई शहरात भाजपाने केलेल्या कामाच्या जोरावर जनतेसमोर जाता येईल, अशी व्यूहरचना भाजपाने केली आहे. त्यातून मुंबईतील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावताना, शिवसेनेला त्याचे श्रेय मिळू नये याची खबरदारी घेतली जात असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांच्या झलक दे भेटीमुळे मुंबईवर आपले साम्राज्य असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेला अप्रत्यक्ष धक़्का बसणारा आहे. 

दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो 3ची पाहणी केली होती. कुलाबा बांद्रे सीप्झ या मार्गाची पाहणी केली. मेट्रो 7 चा प्रकल्प 6 हजार 208 कोटी रुपयांचा असून 16. 4 कि.मी. मार्गाचा हा प्रकल्प दहिसर पूर्व ते अंधेरी पुर्व या मार्गावरून मेट्रो धावणार आहे. वडाळा येथील कास्टिंग यार्डची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत एमएमआरडीएचे आयुक्त यु.पी.एस मदान आणि वरिष्ठ अधिकारी दोन वाजण्याच्या सुमारास मालाड पठाणवाडी येथे पोचले. त्यानंतर येथील गर्डर उभारणीचे काम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रात्रीच्या दिव्याच्या प्रकाशात कामाला वेग आला. कांदिवलीचे स्थानिक भाजपा आमदार अतुल भातखळकर हे घटनास्थळ हजर होते. परंतु, राज्याच्या सत्तेत असलेले पश्‍चिम उपनगरातील शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, दिडोंशीचे आमदार आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना मुख्यमंत्र्यांनी कल्पना दिली असती तर ते हजर राहू शकले असते. परंतु, मेट्रो 7 चेकाम हे भाजपाचा अजेंडा असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. 

दरम्यान, पश्‍चिम द्रुतगती मार्गावरील बोरिवलीकडून बांद्रा दिशेने येणाऱ्या गाड्यांचा एक मार्ग बंद केल्याने अनेक जडवाहने पहाटेपर्यंत रस्त्यांत खोळंबली. त्यामुळे, या मार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसल्या.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हजेरीत एमएमआरडीएचे अधिकारी रात्रभर रस्त्यावर राहून काम करत असल्याने अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मालाड ते कांदिवली दरम्यान मोठी कोंडी झाली. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख