देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री - चंद्रशेखर बावनकुळे

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. आमचे संख्याबळ आज 124 वर पोचले. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होईल आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री - चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर - भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. आमचे संख्याबळ आज 124 वर पोचले. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होईल आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. फडणवीसच पुढील पाच वर्ष राज्याचे सरकार यशस्वीपणे चालवतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

महायुतीचेच सरकार स्थापन व्हावे, ही राज्यातील जनतेची इच्छा आहे. युतीमध्ये ज्या पक्षाकडे जास्त जागा, त्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो. हा नैसर्गीक न्याय आहे. या न्यायाप्रमाणे मुख्यमंत्री भाजपचाच होईल. सरकार स्थापणेमध्ये जो तिढा सध्या सुरु आहे. त्यावर चर्चेतून मार्ग निघेल आणि लवकरच शपथविधी होईल, असे त्यांनी सांगितले. सप्टेबर महीन्यात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आणि आता परतीच्या पावसानेही पिकांना मोठा फटका दिलेला आहे. उद्यापासून मी स्वतः आणि जिल्हाधिकारी दौरा करणार आहोत, असेही ते म्हणाले. 

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, या मागणीचे निवेदन भाजपच्या आमदारांनी आज पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले. निवेदन देताना विधानपरिषद सदस्य गिरीश व्यास, प्राध्यापक अनिल सोले यांच्यासह चरणसिंग ठाकुर, जिल्हा महामंत्री अरविन्द गजभिये, चन्दन गोस्वामी, आनंदराव राऊत होते. ही प्रक्रिया झाल्यानंतर बावनकुळेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com