माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना न्यायालयाचे समन्स

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाकडून 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना न्यायालयाचे समन्स

नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाकडून 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. सदर पोलिसांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी हे समन्स पाठवले. त्यामुळे त्यांना आता 4 डिसेंबर रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. याबाबत ऍड. सतीश उके यांनी दंडाधिकारी न्यायालयाकडे 1 नोव्हेंबर रोजी याप्रकरणाबाबत खुलासा न केल्याच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई करण्याचा अर्ज दाखल केला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येत असताना फडणवीस यांच्या घरी न्यायालयाचे समन्स पोचले. घर फीरले की वासेही फीरतात, असेच आता बोलले जात आहे.

याचिकाकर्त्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन्ही गुन्हे नागपूरमधील आहेत. 2014 ची विधानसभा निवडणूक लढवताना फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही गुन्ह्यांची माहिती लपवली. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे, त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. फडणवीस यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई सुरू करावी, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. या अगोदर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ऍड. उके यांची याचिका फेटाळताना कनिष्ठ न्यायालयाचा पूर्वीचा आदेश कायम ठेवला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑक्‍टोबर रोजी उच्च न्यायालयाचा निकाल बाजूला ठेवत फडणवीस यांच्याविरोधातील तक्रारीवर नव्याने सुनावणी घेण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर दंडाधिकारी न्यायालयाने 4 नोव्हेंबर रोजी हा खटला सारांश फौजदारी खटला म्हणून ठेवला जाईल, असे सांगत नोटीस बजावली. राज्यात एकीकडे महाविकासआघाडीचे सरकार येत असताना, दुसरीकडे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी हा समन्स पोजला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com