ठाकरे सरकारला चोवीस तास होण्याच्या आधीच फडणविसांचे वार सुरू...

विरोधी पक्षनेता म्हणून फडणवीस यांनी कामकाज सुरूही केले...
devendra fadanvis targets sena govt in 24 hours
devendra fadanvis targets sena govt in 24 hours

पुणे : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर पहिल्या दिवसापासून टीका करण्यास सुरवात केली आहे. ठाकरे सरकारला स्थापन होऊन चोवीस तास व्हायच्या आतच त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आहे.

फडणवीस यांनी नव्या सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. ``कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी? ‬‪या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? ‬
‪नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी?‪स्वत:च्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? ‬
‪अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का?‬ ‪भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का? ‪महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे!,``असे त्यांनी टोले लगावले आहेत. 

उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन काही मिनिटेच होत असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या समान कार्यक्रमावर पहिला वार केला होता. फडणवीस यांनी ट्विट करीत महाविकास आघाडीवर टीका करताना म्हटले आहे, की महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाड, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेखसुध्दा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार याकडे लक्ष देईल, अशी आशा करूया, असेही त्यांनी आपल्या ट्विटचा शेवट करत म्हटले आहे.   

शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि मित्रपक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीचे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे जयंत पाटील व छगन भुजबळ, तर कॉंग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 

या शपथविधी सोहळ्याला फडणवीस उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटद्वारे फडणवीस यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यापाठोपाठ काही मिनिटांताच त्यांनी महाविकास आघाडीच्या समान कार्यक्रमावर टीका करीत ठाकरे सरकारवर पहिला वार केला आहे.‬

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com