पवारांना `शोले`तील जेलर म्हणणाऱ्या फडणविसांना पुन्हा आठवला `शोले`

...
devendra fadanvis selectes as opposition leader
devendra fadanvis selectes as opposition leader

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील नूतन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा `शोले` या चित्रपटाची आठवण झाली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी शरद पवार यांची `शोले` चित्रपटातील जेलर म्हणून खिल्ली उडविली होती. आताही त्यांनी सत्ताधाऱ्यांना `शोले`मधील जयचे म्हणजे अमिताभ बच्चनचे स्मरण झाले.

शरद पवार यांची अवस्था `शोले`मधील जेलरसारखी झाल्याचे सांगत त्यांच्यामागे आता कार्य़कर्ते नाहीत, अशी टीका फडणवीस हे प्रचारात करत होते. आधे इधर जाव, आधे उधर जाव और बाकी के मेरे पिछे आव, असे हा जेलर चित्रपटात म्हणत होता. हे संवाद फडणवीस प्रचारात म्हणून दाखवायचे.

त्यांचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर सत्ताधाऱ्या पक्षांतील नेत्यांनी त्यांचे कौतुक केले पण ते टोमणे मारत. ही बाब फडणवीस यांच्या लक्षात आली. ते म्हणाले, ``शोलमधील अमिताभ म्हणजे जय हा बसंतीच्या आईला पटविण्यासाठी ज्या पद्धतीचे `प्रयत्न` करतो, तसेच माझ्याबद्दल बोलले गेले. मात्र कोणी काही टीका केली तरी संविधान आणि नियमाचे पुस्तक याच्या पलीकडे जाऊन मी काम करणार नाही. तुम्ही मला कितीही नाव ठेवली आणि चिडवलं तरी ही मी माझं काम करत राहणार``  

मी पुन्हा येईल, असं म्हणालो होतो. पण टाइम नव्हता सांगितला, असेही प्रत्युत्तर त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले. सांगितले तेवढे सर्व प्रकल्प आम्ही सुरू केले. त्याची उदघाटनेही आम्हीच करू, असा टोला त्यांनी जयंत पाटलांना लगावला. ज्या दिवशी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. त्यादिवशी राजकारणात काहीही होऊ शकत, असेही त्यांनी सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com