घाईगडबडीत विमानतळावरील सभागृहात मुख्यमंत्र्यांनी केले मेधाताईंच्या अहवालाचे प्रकाशन 

घाईगडबडीत विमानतळावरील सभागृहात मुख्यमंत्र्यांनी केले मेधाताईंच्या अहवालाचे प्रकाशन 

पुणे : पुण्यातील कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या पंचवार्षिक अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात झाले.

मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांना भेट देऊन आरती केली. घाईगडबडीत असतानाही मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्याने विमानतळावरील सभागृहातच प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे यावेळी शहर भाजपच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

गणेशोत्सव झाल्यानंतर तातडीने आचारसहिंता जाहीर होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार कुलकर्णी यांनी पाच वर्षात केलेल्या कामाचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

कोथरूडच्या उमेदवारीवरून सध्या विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जात असून त्यात कोथरूडचीही चर्चा आहे. 

कोथरूडमधील उमेदवारीचे आमदार कुलकर्णी यांचे स्पर्धक मुरलीधर मोहोळ यांच्या मंडळाच्या गणपतीच्या आरतीसाठी मुख्यमंत्र्यांनी आज विशेष वेळ दिला आहे.या पार्श्‍वभूमीवर आमदार कुलकर्णी यांच्या अहवाल प्रकाशनाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळ दिल्याने त्याचे वेगळे महत्व आहे. या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी "बॅलन्स' साधल्याचे बोलले जात आहे. 

गेल्या पाच वर्षात आमदार म्हणून आमदार कुलकर्णी यांनी सर्वाधिक प्रश्‍न विचारल्याची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. मतदारसंघात सातत्याने सक्रिय राहण्याबरोबच मतदारसंघाचे प्रश्‍न सरकारी दरबारी मांडण्यातदेखील त्या आघाडीवर राहिल्या आहेत. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com