Devendra Fadanvis praises late Pramod Mahajan | Sarkarnama

प्रमोद महाजन अष्टपैलू व्यक्तिमत्व होते : देवेंद्र फडणवीस 

सरकारनामा
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

माजी केंद्रीय मंत्री दिवंगत प्रमोद महाजन यांच्या 70 व्या जयंती दिनानिमित्त आयोजित रांगोळी  प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन  करण्यात आले.

मुंबई  :" प्रमोदजी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व होते. ते अष्टपैलू होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखविणाऱ्या या रांगोळ्यांमुळे  त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या ",अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिवंगत महाजन यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

माजी केंद्रीय मंत्री दिवंगत प्रमोद महाजन यांच्या 70 व्या जयंती दिनानिमित्त आयोजित रांगोळी  प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन  करण्यात आले.

चेतना महाविद्यालय वांद्रे येथे आयोजित या कार्यक्रमास खासदार पूनम महाजन,आमदार पराग अळवणी, श्रीमती रेखा महाजन आदी कुटुंबीय उपस्थित होते.

या प्रदर्शनात दिवंगत महाजन यांचा जीवनपट उलगडणाऱ्या रंगावल्यांचा समावेश आहे. या प्रदर्शनाची पाहणी करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कलाकृतींना दाद दिली. यावेळी घरोघरी संविधान पोहचविण्याच्या उपक्रमाचा  प्रारंभ मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते संविधानाच्या प्रती वितरणाने  करण्यात आला.संविधान घरोघरी पोहचविण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख