देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शर्मांना सुनावले खडे बोल 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला भाजपमधील नेत्यांमध्येसुरु असलेल्या गटबाजीवर नाराज असल्याचे या प्रकारातून दिसून आले .
sharma cm Patil.
sharma cm Patil.

अकोला :  मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर गेले असता अकोला विमानतळावर काही मिनिटे थांबले होते. यावेळी अकोल्यातील ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांच्यासह भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पालकमंत्री रणजित पाटील यांच्या तक्रारींचा पाढा वाचला. 

 मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनीच आमदार व काही पदाधिकार्‍यांनी केलेल्या  तक्रारी ऐकून घेतल्या नंतर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. इतर पदाधिकाऱ्यांचे सोडा, पण तुमच्यासारख्या ज्येष्ठ आमदाराकडून अशा प्रकारची अपेक्षा नसल्याचे खडे बोल मुख्यमंत्र्यांनी या ज्येष्ठ आमदारांना सुनावल्याची माहिती प्रत्यक्ष उपस्थित नेत्यांकडूनच कळली.

अकोला भाजपमध्ये खासदार संजय धोत्रे आणि राज्यमंत्री रणजित  पाटील  असे दोन गट पडलेले आहेत . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही गटात बॅलन्स करीत असतात . मध्यंतरी संजय धोत्रे खासदार असूनही मुख्यमंत्र्यांनी त्यांना महाराष्ट्र कृषी विद्यापीठ शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे .  हे पद  राज्य मंत्री  दर्जाचे आहे .  लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना पक्ष वाढविण्याच्या कार्यात सर्वांनी झोकून देणे अपेक्षित असताना अजूनही परस्पर विरोधी तक्रारी सुरु असल्याने मुख्यमंत्री नाराज असल्याचे समजते . 

मध्यंतरी रणजित पाटील यांच्या नगरविकास खात्याकडून आलेल्या निधीबद्दल खासदार संजय धोत्रे यांच्या आभाराचे  होर्डिंग्स भाजपच्या नगरसेवकांनी लावले होते . त्यावरूनही वाद आणि चर्चा झाली होती .  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला भाजपमधील नेत्यांमध्ये सुरु असलेल्या गटबाजीवर नाराज असल्याचे या प्रकारातून दिसून आले . 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com