शिवेंद्रसिंहराजेंची देवेंद्र फडणवीसांकडून विचारपूस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी मुंबईतील होली फॅमिली या खासगी रुग्णालयात जाऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
devendra fadanvis meets shivendrasinh bhosale in hospital
devendra fadanvis meets shivendrasinh bhosale in hospital

सातारा :  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी मुंबईतील होली फॅमिली या खासगी रुग्णालयात जाऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नेहमीप्रमाणे त्यांनी हसतमुखपणे गप्पा मारल्या, तसेच शिवेंद्रसिंहराजे यांची पत्नी वेदांतिकाराजे, विक्रमसिंहराजे भोसले यांच्यासह त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांशी त्यांनी चर्चा केली. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याबाबतचे ट्‌विट श्री. फडणवीस यांनी केले आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना काल (ता. 18) रात्री अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील होली फॅमिली या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

काल (मंगळवारी) रात्री शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रकृतीची राजघराण्यातील ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले, माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह विविध नेते मंडळी व निकटवर्तीयांनी साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. 

आज मुंबईत भाजपचे नेते व  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी रुग्णालयात जाऊन शिवेंद्रसिंहराजेंची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नेहमीप्रमाणे दोघांनी हसतमुखपणे गप्पा मारल्या. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी शिवेंद्रसिंहराजे यांची पत्नी वेदांतिकाराजे भोसले, विक्रमसिंहराजे भोसले यांच्यासह त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांशी चर्चा केली. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याचे श्री. फडणवीस यांनी ट्‌विट केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com