Devendra Fadanvis has no other job : Jayant Patil | Sarkarnama

फडणवीसांना सध्या दुसरे कामच उरले नाही :जयंत पाटील  

प्रशांत बारसिंग
बुधवार, 1 जानेवारी 2020

फडणवीसांनी कितीही प्रयत्न केले तरी महाविकासआघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही व्यक्त केला.

मुंबई  :   अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे, देवेंद्र फडणवीस यांना सध्या दुसरं काहीही काम नाही. त्यातच त्यांच्या मनासारखं काही होत नाही. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस यांची मन:स्थिती समजू शकतो, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. 

फडणवीसांनी कितीही प्रयत्न केले तरी महाविकासआघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही व्यक्त केला.

खाते वाटपासंदर्भात आघाडीच्या तिन्ही पक्षांची महत्त्वाची बैठक झाली. यानंतर जयंत पाटील यांनी खातेवाटपावरही भाष्य केले.

जयंत पाटील म्हणाले की, खातेवाटपाबाबत कुठलेही मतभेद नाहीत. आज किंवा उद्या खातेवाटप होईल. मुख्यमंत्री खातेवाटप लवकरच जाहीर करतील. कोणत्याही पक्षात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत नाराजी नाही. अशी नाराजी असल्यास तिन्ही पक्ष ती नाराजी दूर करण्यास सक्षम आहेत.

वस्तू आणि सेवा कराविषयी (जीएसटी) देखील बैठक झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. जीएसटीचे उत्पन्न घटल्याने केंद्राकडून यायला हवा तो निधी येत नाही, असेही त्यांनी नमूद केले. तसेच पीएमसी बॅंकेचे विलीनीकरण राज्य सहकारी बॅंकेत करता येणार नसल्याचेही स्पष्ट केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख