अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या  ‘मिशन साहसी’ने महिलांना बळ - फडणवीस  - Devendra Fadanvis attends ABVP's "Mishan Sahasi " event | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या  ‘मिशन साहसी’ने महिलांना बळ - फडणवीस 

सरकारनामा  
मंगळवार, 6 मार्च 2018

 महिलांच्या सक्षमीकरणाच्या  कार्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ‘मिशन साहसी’च्या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे नवीन पाऊल टाकले आहे. हे प्रशिक्षण राज्यातील प्रत्येक मुलींपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :  महिलांच्या सक्षमीकरणाच्या  कार्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ‘मिशन साहसी’च्या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे नवीन पाऊल टाकले आहे. हे प्रशिक्षण राज्यातील प्रत्येक मुलींपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. त्यातून सशक्त भारत, सशक्त महाराष्ट्र उभा करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महिलांचा सन्मान करणारा देशच महाशक्ती बनेल. देशात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध मोठी जागृती निर्माण होत आहे. अशा प्रवृत्तीविरुद्ध लढण्यासाठी त्या सज्ज झाल्या असून त्यासाठी त्यांना अशा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. ज्या देशात अशा साहसी मुली असतील त्या देशाला प्रगतीपासून कोणीही रोखू शकत नाही. त्या देशात कितीही अत्याचारी, दुराचारी जन्मले तरी त्यांना व अशा मानसिकतेला नष्ट करण्याची ताकद त्या मुलींकडे आली आहे.

महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी प्रशिक्षण व आत्मविश्वासाची आवश्यकता आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उपक्रमामुळे महिलांवर हल्ला करणाऱ्या व त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविण्याचा प्रयत्न निष्फळ ठरेल, असा विश्वास आहे. हे प्रशिक्षण राज्यातील प्रत्येक विद्यार्थीनीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व मुलींना अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल व त्यातून सशक्त महाराष्ट्र, सशक्त भारत उभा करू, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी सुमारे हजाराहून अधिक मुलींनी मिशन साहसीमध्ये घेतलेल्या प्रशिक्षणाची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. एखाद्याने हल्ला केला तर कसा प्रतिकार करायचा, दुचाकीवरून छेड काढून पळून जाणाऱ्यास कसे पकडायचे तसेच कठिण परिस्थितीचा कसा मुकाबला करायचे याचे मुलींनी प्रात्यक्षिक दाखविले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख