वाघ आणि सिंह एकत्र आले की राज्य कोणाचे हे सांगण्याची गरज नाही : फडणवीस 

वाघ आणि सिंह एकत्र आले की राज्य कोणाचे हे सांगण्याची गरज नाही :  फडणवीस 

मुंबई : जंगलात जेव्हा वाघ आणि सिंह एकत्र येतात तेव्हा तेथे राज्य कोणाचे असते हे सांगण्याची गरज नाही. शिवसेना-भाजप एकत्र आल्याने राज्य कोणाचे हे सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्र कोणाला कौल देणार हे ही सांगण्याची गरज नाही. आमच्यातही ताणतणाव होते मात्र राज्याच्या आणि देशाच्या भल्या करता आम्ही एकत्र आलो असे असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा येथे केले. 

शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. यावेळी मुंबईच्या महापौरांसह शिवसेनेचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सातारा मतदारसंघातून साडेचार लाख मतदान घेणारे नरेंद्र पाटील, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, राज्यातील मंत्री जयदत्त क्षिरसागर,तानाजी सावंत यांच्यासह शिवसेनेच्या सर्व अठरा खासदारांचा सत्कार करण्यात आला. 

फडणवीस पुढे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा युतीचे सरकार सत्तेवर आले आहे. लोकसभेतील विजयाचे शिल्पकार खऱ्या अर्थाने युतीचे कार्यकर्ते आहेत. शिवसेनेच्या मेळाव्याला मी जाणार की नाही याबाबत गेल्या दोन दिवसापासून चर्चा होती. पण, शिवसेनेच्या मेळाव्याला जाताना काही कमीपणा वाटत नाही. कारण मी माझ्या घरीच आलो असे मला वाटते. शिवसेना भाजप हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आली आहे. ही सर्वात जुनी युती आहे. माझे राजकारणही भगव्याची शपथ घेऊन झाली आहे. आमचं हिंदुत्व संकुचित नाही. 

शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या समर्थ नेतृत्व दिले. त्यांनी हिंदुत्वाची ज्योत पेटविली. त्यांचे आशिर्वाद आणि प्रेरणा घेऊनच आम्ही कार्य करतो. बाळसाहेबांना माझी मानवंदना असे मुख्यमंत्री म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

दरम्यान,101 वाघांनी साकारलेली बाळासाहेबांची फ्रेम उद्धव ठाकरे यांना जयदत्त क्षीरसागर यांनी दिली. शिवसेनेच्या कार्यक्रमाला शरद सोनावणे यांचा उल्लेख मनसेचे आमदार शरद सोनावणे असा केला, त्यानंतर शिवसेनेत प्रवेश केलेले सोनावणे असा उल्लेख करण्यात आला.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com