भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस 

भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस 

मुंबई : भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची निवड होण्याची शक्‍यता आहे. 

भाजपचे निवडून आलेले राज्यातील आमदार आज विधानभवनात आले आहेत. भगवे फेटे बांधून आमदारांचे स्वागत करण्यात आले आहे. परळीत पराजय झालेल्या ज्येष्ठ नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडेही नेता निवडीच्या बैठकीला उपस्थित होत्या. विधिमंडळ नेतेपदासाठी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडला. या ठरावाला सुधीर मुनगंटीवार यांच्यासह दहा आमदारांनी अनुमोदन दिले. 

भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी फडणवीस यांची एकमतांनी निवड करण्यात आली आहे. भाजपच्या नेता निवडीची प्रक्रिया मोठ्या उत्सवात पार पडली. फडणवीस यांनी नेता निवड झाल्याने पुन्हा फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com