15 वर्षाच्या तुलनेत आम्ही दुप्पट कामे केले, देवेंद्र फडणविसांचा दावा 

15 वर्षाच्या तुलनेत आम्ही दुप्पट कामे केले, देवेंद्र फडणविसांचा दावा 

नागपूर : त्यांच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात जेवढी कामे झाली नाहीत, त्यापेक्षा दुप्पट कामे आम्ही पाच वर्षांत केली. या विषयावर चर्चेला मी त्यांच्यासोबत कुठल्याही व्यासपीठावर बसायला तयार आहे. हे जर खोटे ठरले तर मी यात्रा मध्येच सोडून देईन आणि पुढील यात्रा करणार नाही. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज महाजनादेश यात्रेच्या सुरुवातीला झालेल्या जाहीर सभेत म्हटले. 

यावेळी कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे नाव मात्र त्यांनी घेतले नाही. 60 वर्षातल्या समस्या केवळ पाच वर्षांत सुटणे शक्‍य नाही. पण 15 वर्षाच्या तुलनेत आम्ही दुप्पट काम केले हे निश्‍चित आहे. याचा कौल लोकसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला दिला आहेच. विधानसभा निवडणुकीतही जनतेच्या आशिर्वादाने आम्ही 220 च्या पार सहजच जाऊ, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

राज्यातील सर्व समस्या सोडविल्याचा दावाही आम्ही कधीच केला नाही. आणि खोटे दावे करणारही नाही. पाच वर्षात जे केले आणि पुढील पाच वर्षात जे करायचे आहे, याबाबत जनतेशी संवाद साधण्यासाठी आम्ही राज्याच्या यात्रेवर निघालो आहोत. पुढील पाच वर्षांत आम्हाला समृद्ध महाराष्ट्र तयार करायचा असल्याचे फडणवीस म्हणाले. 


तीन किलोमीटरपर्यंत गर्दी आणि 35 गाड्यांचा ताफा 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला आज अमरावती जिल्ह्याच्या मोझरी तालुक्‍यातील गुरुकुंज मोझरी या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळापासून सुरुवात झाली. यावेळी झालेल्या जाहीर सभेसाठी गुरुकुंजच्या दुतर्फा जवळपास तीन किलोमीटर अंतरापर्यंत लोकांनी गदीँ केली होती. यात्रा रथासोबत असलेला 30 ते 35 वाहनांचा ताफा गुरुकुंजवासीयांठी आकर्षण ठरला. 

नागपुरच्या दिशेने एक ते दीट किलोमीटर आणि अमरावतीच्या दिशेनेही जवळपास एक ते दीड किलोमीटरपर्यंत लोकांची गर्दी केली होती. फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग जेव्हा कार्यक्रमस्थळी येत होते.

तेव्हा लोकांची गर्दी दिसताच राजनाथ सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले की, "क्‍या हम राष्ट्रसंत के समाधीस्थल पहुंच गये ?', तेव्हा फडणविसांनी त्यांना सांगितले, "नही अभी दो किलोमीटर दूर है.' हे ऐकून त्यांना आश्‍चर्य वाटले. आणि त्यांनी "यात्रा के शुरुआत मेही आपको जनादेश मिल गया, ऐसा ये भिड बोल रही है.' असे म्हटल्याचे मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com