ठाणे: बाळासाहेब कधीही जातपात धर्म पाहत नसत. सर्वच पक्षांमध्ये बाळासाहेबांचे चाहते आहेत. तेव्हा फडणवीस आणि पंकजा मुंडे स्मृतिस्थळावर नतमस्तक होणे, हा त्यांच्या श्रद्धेचा व भक्तीचा विषय आहे, अशी सावध प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळी ठाण्यातून खास लोकल ट्रेनने एकनाथ शिंदे व शेकडो शिवसैनिक रवाना झाले. या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी भेट दिल्याबाबत शिंदे याना छेडले असता त्यांनी ही सावध प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांच्या या प्रतिक्रियेमुळे आजही फडणवीस आणि शिंदे यांच्यातील मैत्रीतील संबंध मधुर असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, महाशिवआघाडीचा समान किमान कार्यक्रम तयार करण्यात आला असून लवकरच तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील आणि महाराष्ट्राला लवकरच उत्तम सरकार मिळेल, असा विश्वास या वेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.