बाळासाहेबांनी तुम्हाला माफ केलं असतं का ? उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचा सवाल 

बाळासाहेबांनी तुम्हाला माफ केलं असतं का ? उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचा सवाल 

मुंबई : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांना मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असा शब्द दिला होता मात्र त्यानी सांगावे की बाळासाहेब ठाकरे यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिवावर मुख्यमंत्री केल्याचे आवडले असते का ? बाळासाहेबांनी तुम्हाला माफ केले असते का ? "असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. 

नवी मुंबईत सुरू असलेल्या भाजपच्या अधिवेशनात मार्गदर्शन करताना फडणवीस चांगलेच आक्रमक झाले होते. ज्येष्ठ शरद पवार, शिवसेना, सीएए आणि एनआरसी आदी मुद्यांना स्पर्श करीत त्यांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन केले. 

यावेळी नेहमीप्रमाणे फडणवीस यांनी महाराष्ट्रात जनादेशाचा विश्वासघात झाल्याची खंत व्यक्त केली.ते म्हणाले,"अयोध्येत राममंदिर व्हावे म्हणून आम्ही लढा दिला आता काहीजण तिकडे जाणार आहेत मात्र तिथं गेल्यावर रामाने त्यांना चांगली बुद्धी द्यावी आणि त्यांचा मूळ स्वभाव जागा व्हावा."अशी कोपरखळी त्यांनी ठाकरे यांना मारली. 

विधानसभा निवडणुकिमध्ये आपण चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मॅच जिंकलो. भाजपा स्वबळावर सरकार आल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या सारखा गिरणी कामगाराचा मुलगा हा भाजपाचा अध्यक्ष होऊ शकतो.हि फक्त भाजपा मध्ये होऊ शकते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com