शिवसेनेचे हिंदुत्व सोनिया गांधीच्या चरणी, देवेंद्र फडणविसांचा हल्लाबोल 

शिवसेनेचे हिंदुत्व सोनिया गांधीच्या चरणी, देवेंद्र फडणविसांचा हल्लाबोल 

पुणे : शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे. त्यांना लखलाभ आहे. भाजप हटावचा अजेंडा घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी निघाले आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. 

शिवसेना हिंदुत्ववादी आहे आता त्यांचे हिंदुत्व सोनिया गांधी चरणी गेले आहे हे ही ते सांगण्यास विसरले नाहीत. 

अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन आपणही राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. ते म्हणाले, की शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे. खरेतर आम्ही एकत्र लढलो होतो जेव्हा सत्ता स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी आमच्याकडे पर्याय असल्याचे सांगण्यास सुरवात केली. ते भिन्न विचारसरणीबरोबर गेले याचे आम्हाला आश्‍चर्य वाटले. ते आमच्याशी चर्चा न करता मातोश्रीबाहेर पडून इतर नेत्याबरोबर चर्चा करीत होते.

भाजप आता विरोधीबाकावर बसणार असून आमच्याकडे बहुमत नाही हे स्पष्ट झाले आहे. अजितदादा मला आज भेटले आणि म्हणाले, की मी तुमच्याबरोबर यापुढे राहू शकत नाही. त्यांनी राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमतच नाही हे स्पष्ट होत असल्याने आम्ही विरोधीबाकावर बसणार आहोत. मी पत्रकार परिषद संपली की राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा देणार आहे. शिवसेना बरोबर न आल्याची खंत फडणवीस यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. दोन्ही कॉंग्रेसपेक्षा त्यांनी शिवसेनेलाच लक्ष केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com