फडणवीसांनी 5 वर्षे टोळी सारखे सरकार चालवले : संजय राऊत यांची टिका

देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते बनले हा काळाने त्यांच्यावर उगवलेला सूड आहे, अशी टिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे झालेल्या एका कार्यक्रमात केली
Sanjay Raut Allegation on Ex CM Devendra Fadanavis
Sanjay Raut Allegation on Ex CM Devendra Fadanavis

नाशिक : ''गेली पाच वर्षे राज्यात शिवसेना भाजप सोबत सत्तेत होती. मात्र मी कधीही भाजपजवळ गेलो नाही. ते एखाद्या टोळीसारखे सरकार चालवत होते. अमरपट्टा घेऊन आल्यासारखे वागत होते. आमच्या पक्षप्रमुखांची अवहेलना केली जात होती. त्यामुळे फडणवीसांना सत्तेपासून रोखने ही दोन्ही कॉंग्रेसची देखील गरज होती. त्यातून जे घडले ते महाविकास आघाडीचे सरकार आज सगळ्यांपुढे आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातील परिवर्तनाचे केंद्र बनले,'' असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी येथे सांगीतले.

ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे महाकवी कालिदास कलामंदिरात शनिवारी झालेल्या 'आमने-सामने' या मुलाखतीवेळी खासदार राऊत बोलत होते. राजू परुळेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ''मंत्रालय हे जनतेचे प्रश्‍न सोडविण्याचे केंद्र असते. मात्र गेल्या सरकारने मंत्रालय षडयंत्र करणे, आपले पक्षातंर्गत विरोधक संपविणे अन्‌ विरोधी पक्षाना त्रास देण्यासाठी त्याचा वापर केला. अतिशय वेडेवाकडे उद्योग झाले. शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेऊन पडद्यामागे वेगळेच उद्योग त्या सरकारने केले. पक्षात व राजकारणात विरोधक ठेवायचाच नाही, अशा टोळी पद्धतीने सरकारी यंत्रणा वापरली. हा संताप लोकांमध्ये निर्माण झाला. यावरही ते थांबले नाहीत तर त्यांच्या 80 दिवसांच्या सरकारमध्ये चक्क काही अधिकारी आमदार फोडण्याचे काम करत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते बनले हा काळाने त्यांच्यावर उगवलेला सूड आहे.''

"आम्ही महान आहोत' हे दाखविण्यासाठी भाजपचा सतत आटापिटा असतो. त्यातून गांधी, नेहरू कुटुंबावर खालच्या पातळीवर जाऊन ते टीका करतात. कॉंग्रेसने या देशाला दिशा दिली आहे. देशउभारणीचे काम त्यांनी केले. स्वातंत्र्य चळवळीत फक्त कॉंग्रेस होती. भाजप कुठे होता. कॉंग्रेसवर भाजपचे आरोप म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. गांधी घराण्याच्या त्यागाच्या आसपास आज एकही कुटुंब जाऊ शकत नाही.'' असेही ते म्हणाले.

दिल्लीतील राजकारण आणि शरद पवार यांच्याविषयी ते म्हणाले, ''सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता पवार म्हणजे दिल्लीत लढणारा शेवटचा मावळा आहेत. अनेकांना आता पवार यांची महानता समजायला लागली. दिल्लीत मंत्र्यांना कोणी ओळखत नाही. मात्र, शरद पवार यांना ओळखतात, हे त्यांचे कर्तृत्व असून, त्यातूनच परिवर्तनाचा केंद्रबिंदू महाराष्ट्र असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. पवार यांनी देशाचे नेतृत्व करावे. त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू.''

यावेळी कृषीमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार हेमंत टकले, मनसेचे नेते डॉ. प्रदिप पवार, कॉंग्रेस प्रवक्‍त्या डॉ. हेमलता पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार सुहास कांदे, नरेंद्र दराडे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, बाळासाहेब सानप, संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, जिल्हा प्रमुख विजय करंजकर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com