मुख्यमंत्री आज शहाद्यामध्ये; राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार

भाजप- शिवसेना महायुतीच्या जिल्हयातीलउमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (ता. 9) जिल्ह्यात प्रचारसभा होत आहे. शहादा येथील बाजार समितीच्या प्रांगणात दुपारी दोनला होणाऱया सभेत जिल्ह्यातील भाजपच्या प्रचाराला सुरवात होईल, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधऱी यांनी दिली.
Devendra Fadanavis
Devendra Fadanavis

नंदुरबार : भाजप- शिवसेना महायुतीच्या जिल्हयातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (ता. 9) जिल्ह्यात प्रचारसभा होत आहे. शहादा येथील बाजार समितीच्या प्रांगणात दुपारी दोनला होणाऱया सभेत जिल्ह्यातील भाजपच्या प्रचाराला सुरवात होईल, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधऱी यांनी दिली.

शहादा- तळोदा मतदारसंघातून भाजपचे राजेश पाडवी, नंदुरबारमधील डाॅ. विजयकुमार गावित, नवापूरमधील भरत गावित आणि अक्राणीमधील शिवसेनेचे आमशा पाडवी या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डाॅ. हिना गावित, डाॅ. सुभाष भामरे आणि जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डाॅ. विक्रांत मोरे, संपर्क नेते बबनराव थोरात यांच्यासह भाजप- शिवसेना महायुतीचे सर्व पदाधिकारी सभेस उपस्थित राहतील.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे दुपारी दोनला शिरपूरहून पूज्यसाने गुरूजी विद्या प्रसारक संस्थेच्या प्रांगणावर हेलिकाॅप्टरने आगमन होईल. तेथून ते कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातील सभास्थळी जातील. तेथील सभेनंतर दुपारी तीनला ते साक्रीकडे प्रयाण करतील

राजेंद्र गावितांचा प्रवेश
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असे सूत्रांनी सांगितले. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारीही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने शहादा मतदारसंघातील भाजपची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com