फडणवीसांनी बिघडवली राज्याची अर्थिक शिस्त; शरद पवारांचा आरोप

नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या काळातच 'कॅग'चा अहवाला आला आहे. या अहवालाची दखल घेत पवार यांनी तातडीने चौकशीची मागणी केली आहे. विधानसभा अधिवेशनाच्या काळात माजी मुख्यमंत्री फडणवीस राज्य सरकारच्याविरोधात आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या अहवालाच्या निमित्ताने फडणवीस यांना यापुढील काळात 'टार्गेट' केले जाऊ शकते.
Devendra Fadanavis Disturbed Financial Discipline in Maharashtra Say Sharad Pawar
Devendra Fadanavis Disturbed Financial Discipline in Maharashtra Say Sharad Pawar

पुणे : 'कॅग'च्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षातील 46 हजार कोटी रूपयांच्या हिशेबाचा मेळ लागत नाही. हिशेब दिला जात नाही. या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची अर्थिक शिस्त बिघडवली आहे. या प्रकरणाची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात दिली.

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी "कॅग'च्या दोन दिवसांपूर्वी आलेल्या अहवालाचा संदर्भ देत राज्याच्या बिघडलेल्या अर्थिक स्थितीवर बोट ठेवले. पवार म्हणाले, "अर्थिक शिस्त हे राज्याचे आजपर्यंतचे वैशिष्टय होते. मात्र, गेल्या पाच वर्षात ही शिस्त पूर्ण बिघडली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही शिस्त बिघडवण्याचे काम केले आहे. या काळात नेमके काय झाले. कॅगने नेमके काय आक्षेप घेतले आहेत. याची चौकशी करण्याची गरज आहे. स्वतंत्र समिती नेमून चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन संपूर्ण चौकशीची मागणी करणार आहे.''

नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या काळातच 'कॅग'चा अहवाला आला आहे. या अहवालाची दखल घेत पवार यांनी तातडीने चौकशीची मागणी केली आहे. विधानसभा अधिवेशनाच्या काळात माजी मुख्यमंत्री फडणवीस राज्य सरकारच्याविरोधात आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या अहवालाच्या निमित्ताने फडणवीस यांना यापुढील काळात 'टार्गेट' केले जाऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com