15 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर देवेंद्र फडणवीस यांना जामीन

फडणवीस यांना न्यायालयाने आज न्यायालयात उपस्थित राहण्याची शेवटची संधी दिली होती. त्यानुसार आज ते हजर झाले
Devendra Fadanavis Appeared in Court Got Bail
Devendra Fadanavis Appeared in Court Got Bail

नागपूर : सन 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपविल्याने राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज अॅड. सतीश उके यांनी न्यायालयात दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी करताना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर फडणवीस यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

फडणवीस यांना न्यायालयाने आज न्यायालयात उपस्थित राहण्याची शेवटची संधी दिली होती. त्यानुसार आज ते हजर झाले. यावेळी फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ''जनतेसाठी केलेल्या आंदोलनांमुळे आपल्यावर काही गुन्हे दाखल झाले होते. लोकांसाठी संघर्ष करताना दाखल झालेली सर्व प्रकरणे आहेत. 2014 च्या आणि यावेळच्या निवडणुकीतही 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मते मी घेतली आहेत आणि या निवडणुकांमध्ये प्रक्रीयेवर परीणाम करतील, असे कुठलेही गुन्हे मी लपविलेले नाहीत. ज्या गुन्ह्यांसाठी न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले, ती 1993 ते 1998 दरम्यानची आहेत. आंदोलना दरम्यानचीच आहेत. दोन खासगी प्रकरणे दाखल करण्यात आली होती आणि ती निकालीही निघाली होती. या दाखल प्रकरणी सर्व माहीती न्यायालयाला देऊ,''

न्यायपालिकेवर माझा पूर्ण विश्‍वास असे सांगताना यामागे कोण आहे याचीही आपल्याला कल्पना असल्याचे ते म्हणाले. पण प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने आता त्यावर जास्त बोलणे योग्य नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com