सांगूनही न ऐकल्यास बंडखोरांना त्यांची जागा दाखवू - देवेंद्र फडणवीस

 सांगूनही न ऐकल्यास बंडखोरांना त्यांची जागा दाखवू - देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात शिवसेना आणि भाजप आणि मित्रपक्षांची युती झालेली आहे, ज्या ठिकाणी बंडखोरी झालेली आहे त्या कार्यकर्त्यांना दोन्ही पक्षांतील नेते समजावून सांगतील जर नेत्यांनी समजावून सांगूनही हे बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात थांबले तर महायुती अशा बंडखोरांना सर्वशक्तीनीशी त्यांची जागा दाखवून देईल असा खणखणीत इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि आदित्य ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मानोहर जोशी आदी नेते उपस्थित होते. राज्यातील जनतेच्या मनात जी युती होती ती महायुती प्रत्क्षात आल्याचा दावही फडणवीस यांनी केला. 

उद्धव ठाकरे यांनीही युतीची ग्वाही देत महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, तसेच आदित्य कधी मुख्यमंत्री होणार हे तो सांगेल, आमच्यात म्हणजे भाजप व शिवसेनेत जे काही ठरलंय ते तुम्हाला प्रत्यक्षात आलेले दिसेल असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक करून मुंबईतील उमेदवारांमध्ये सर्वाधिक मतांनी आदित्य विजयी होतील असा विश्‍वासही व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com