devendra and shivsena leader | Sarkarnama

अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर झाला नाही - देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

निवडणुका झाल्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे सर्व पर्याय खुले आहेत असा दावा पहिल्याच पत्रकार परिषदेत केला होता त्यातून त्यांना बहुतेक अन्य पक्षाबरोबरच जायचे असावे असा स्पष्ट आरोप फडणवीस यांनी केला. ते म्हणाले माझ्या वक्तव्यावर जर गैरसमज होते तर ते चर्चेतून दूर करता आले असते, मात्र शिवसेनेने चर्चेचा पर्याय बंद केला होता.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष वाटून घ्यायचे असा कुठलाही निर्णय माझ्यासमोर झाला नव्हता, त्यामुळे दिवाळीच्यावेळी मी जो बोललो ते खरेच होते, वरिष्ठांनीदेखील असा कुठलाही शब्द दिला नसल्याचे सांगितले होते असा खणखणीत खुलासा मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर श्री. फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत अनेक गोष्टीचा खुलासा केला. 

निवडणुका झाल्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे सर्व पर्याय खुले आहेत असा दावा पहिल्याच पत्रकार परिषदेत केला होता त्यातून त्यांना बहुतेक अन्य पक्षाबरोबरच जायचे असावे असा स्पष्ट आरोप फडणवीस यांनी केला. ते म्हणाले माझ्या वक्तव्यावर जर गैरसमज होते तर ते चर्चेतून दूर करता आले असते, मात्र शिवसेनेने चर्चेचा पर्याय बंद केला होता. त्यांनी आमचा फोनही घेतला नाही, आमच्याशी चर्चा करण्याऐवजी त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसशी चर्चा करायला दररोज वेळ होता अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर त्यांनी वेळोवेळी केलेली टीकाही चुकीची होती. त्यांच्या आजुबाजुचे लोक आमच्या पक्षावर टीका करत होत,े मात्र आमच्याकडून त्यांना कुठलेही उत्तर दिले गेले नाही असाही त्यांनी दावा केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख