जलसंपदा खात्याचे पूर्वीचे चित्र आता बदलले आहे - देवेंद्र फडणवीस

 जलसंपदा खात्याचे पूर्वीचे चित्र आता बदलले आहे - देवेंद्र फडणवीस

सातारा : छत्रपतींच्या शुभेच्छा व जिल्ह्यातील जनतेचे आशिर्वादावर आम्ही सर्व कामे वेळेत मार्गी लावू. मेडिकल कॉलेजच्या पदनिर्मितीबाबत येत्या एक महिन्यात निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. फडणवीस म्हणाले, गेल्या चार वर्षात आम्ही 20 हजार कोटींच्या रस्त्यांची कामे मंजूर केली असून यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत. आगामी पाच वर्षात उर्वरित कामे पूर्ण होणार आहेत. महाराष्ट्रात रस्त्याचे जाळे आगामी तीन वर्षांत पूर्ण होईल. गेली 20 वर्षे ज्या कामांसाठी आंदोलने झाली त्या सर्व कामांबाबत आम्ही निर्णय घेतले. 

पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्पांची कामे कामे हाती घेतली आहेत. आम्ही विरोधात होतो, त्यावेळी सत्ताधारी विदर्भावर अन्याय करून पश्‍चिम महाराष्ट्राला निधी देत असल्याचे चित्र होते. आता आम्ही सत्तेवर आलोय त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातही विकास कामे सुरू आहेत. पूर्वी जलसंपदा खात्यात काय चालले होते हे सांगायची गरज नाही, असे सांगून ते म्हणाले, सध्या गिरिश महाजन यांनी या खात्याचे चित्र बदलले आहे. जास्तीतजास्त कामांच्या निवीदा बिलो टेंडर मंजूर होत आहेत. आता हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांमुळे 2019 पर्यंत राज्यातील 50 टक्के क्षेत्र सिंचनाखाली येईल. 

छत्रपतींच्या शुभेच्छा व जिल्ह्यातील जनतेचे आशिर्वाद मिळाले तर आम्ही सर्व कामे वेळेत मार्गी लावू. मेडिकल कॉलेजच्या पदनिर्मितीबाबत येत्या एक महिन्यात निर्णय घेतला जाईल. प्रलंबित वीज कनेक्‍शनसाठी दोन योजना आम्ही आणल्या आहेत. यामध्ये एक लाख सोलर पंपाचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच तत्काळ कनेक्‍शन मिळण्यासाठी सोलार फिडर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही हक्काची विज मिळेल. उपसा सिंचन योजनांचाही प्रश्‍न गंभीर आहे. वीजबिल थकित राहिल्याने त्या बंद पडत आहेत. या साठी या योजना सोलरवर करणार आहोत. यातून सरकार व शेतकऱ्यांचे पैसे वाचणार आहेत. तसेच त्यातून दुष्काळी भागांना पाणी देता येणे शक्‍य होणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या आठ हजार पाणी योजना आम्ही पूर्ण केल्या असून आणखी दहा हजार योजना सुरू केल्या आहेत. त्याही लवकरच पूर्ण होतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

या वेळी गिरिश महाजन, चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले, विजय शिवतारे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल रूक्‍मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महामार्ग प्राधिकरणाचे डी. ओ. तावडे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, शंभूराज देसाई, दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, दीपक पवार, मनोज घोरपडे, ऍड. भारत पाटील यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com