"गरीबी हटाव'चा नारा देतांना राहुल गांधीना लाज कशी वाटत नाही : फडणवीस

"गरीबी हटाव'चा नारा देतांना राहुल गांधीना लाज कशी वाटत नाही : फडणवीस

जळगाव : "या सरकारला लाज कशी वाटत नाही'अशी कॉंग्रेसने निवडणुकीत सरकारविरोधात जाहिरात दिली आहे. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानीं कॉंग्रेसवर टिका करीत राहुल गांधी यांच्या पणजोबा पासून तर थेट आईपर्यंत सर्वानीच गरीबी हटावचा नारा दिला मात्र आजपर्यंत गरीबी हटली नाही, तरी आता राहूल गांधी यांनी पुन्हा तोच नारा दिला आहे. त्यांना लाज कशी वाटत नाही. असा सवाल उपस्थित केला आहे. जळगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. 

भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचे उमेदवार उन्मेश पाटील यांच्या प्रचारार्थ सागर पार्कवर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन,जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मिता वाघ,आमदार चंदूभाई पटेल, उपस्थित होते. प्रारंभी हनुमान जयंती निमित्ताने गदा देवून आमदार भोळे यांनी मुख्यमंत्र्याचे स्वागत केले. 

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे पणजोबा पंडित नेहरू, आजी इंदिरा गांधी,वडिल राजीव गांधी, आई सोनिया गांधी यांनी "गरीबी हटाव'चा नारा दिला परंतु आजपर्यंत गरीबी हटली नाही, आता राहुल गांधीही तोच नारा देत आहे.अशी खोटी आश्‍वासन देतांना यांना लाज कशी वाटत नाही, हे काय खावून गरीबी हटविणार हा प्रश्‍नच आहे, हे गरीबी हटवूच शकत नाहीत.या देशातील गरीबी केवळ नरेंद्र मोदीच हटवू शकतात असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. सध्या होत असलेली लोकसभा निवडणूक ही देशाची सिमा सुरक्षित ठेवणारी तसेच विकासाची निवडणूक आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनाचारी व दुराचारी व भ्रष्टाचारींना सत्तेपासून दूर ठेवणारी ही निवडणूक आहे.सबका साथ, सबका विकास हा मोदींचा मंत्र जनता खऱ्या अर्थाने साकार करणार असून पुन्हा पंतप्रधानपदी त्यांनाच निवडून देणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com