महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा फेब्रुवारीत दुष्काळी अनुदान दिले - देवेंद्र फडणवीस

  महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा फेब्रुवारीत दुष्काळी अनुदान दिले - देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद : महाराष्ट्रावर संकट आले तेव्हा पंतप्रधान मोदींनी चार हजार सातशे कोटी रुपये दिले, त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांना कशाचीही कमतरता पडू नये या भावनेतून महाराष्ट्राला ही मदत दिली गेली. राज्य सरकारनेही इतिहासात पहिल्यांदा फेब्रुवारी महिन्यातच शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचे वाटप केल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री जालन्यात आले होते. अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभेत बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, निवडणुकीपेक्षा आमच्यासाठी शेतकरी, सर्वसामान्य माणूस महत्वाचा आहे. या भावनेतूनच मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट आले तेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासत पहिल्यांदा आपण फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. 

एकट्या जालना जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा करण्यात आले आहे, उर्वरित देखील लवकरच जमा होणार आहे. निवडणुकीचे काम निश्‍चित करा, रावसाहेबांनी जरुर निवडूण आणा पण आपापल्या गावाकडे जातांना सरकराकडून केल्या जात असलेल्या दुष्काळी योजनांकडे देखील लक्ष द्या. 

निवडणुक आचारसंहितेच बंधन पाळा, पण लोकांपर्यत मदत पोहचवण्यासाठी कुठेलच बंधन नसते हे देखील लक्षात असू द्या. शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारची योजना, मदत पोचत नसेल तर प्रशासनाच्या निर्दशनास आणून द्या असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

पाच वर्षात मराठवाड्यासाठी खूप केले.. 
राज्य सरकारने मराठवाड्यात पाच वर्षात खूप कामे केली. शेतकरी कर्जमाफी, पिण्याच्या पाण्याच्या, सिंचनाच्या योजना, मराठवाडा ग्रीड, समृध्दी महामार्ग, ड्रायपोर्टमुळे औरंगाबाद-जालना ही शहर महाराष्ट्रातील उद्योगाचे केंद्र बनणार आहे. आयटीसी सेंटरच्या माध्यमातून रावसाहेब दानवेंच्या नेतृत्वाखाली जालन्याचा कायापालट झालेला आपल्याला काही दिवसांत पहायला मिळेल असा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com