लेकीला पाच वर्षात हॉटेलातही जेवायला नेऊ शकलो नाही...

लेकीला पाच वर्षात हॉटेलातही जेवायला नेऊ शकलो नाही...

पुणे : पाच वर्षांच्या काळात वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टी राहून गेल्या. पाच वर्षात लेकीला अगदी एकदाही हॉटेलात जेवायला घेऊन जाऊ शकलो नाही. जवळच्या मित्रांना पुरेसा वेळ देता आला नाही, अशी भावना माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात व्यक्त केली. 

मुख्यमंत्रीपदाच्या पाच वर्षाच्या काळात काय कमावले, काय गमावले या पत्रकारांच्या प्रश्‍नाला फडणवीस यांनी काहीसे भावनिक होत उत्तर दिले. पाच वर्षे धावपळीची होती. या काळात घरच्या लोकांना, नातेवाईकांना तसेच मित्र मंडळींना वेळ देता आला नाही. इतकेच काय लेकीला एकदाही हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाऊ शकलो नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपद हे राज्याचे प्रमुखपद असते. संपूर्ण राज्याचा व्याप या पदावरील व्यक्तीला पाहावा लागतो. बैठका, सभा, प्रशासकीय कामकाज, परदेश दौरे आणि राज्यभरातील दौरे अशा भरगच्च कार्यक्रमांनी मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक दिवस व्यस्त असतो. त्यामुळे फडणवीस यांनी व्यक्त केलेली भावना काहीशी वेगळी होती. 

मुख्यमंत्री असताना आखलेल्या कार्यक्रमानुसार कोणत्याही मुख्यमंत्र्यांना फिरावे लागते. विरोधी पक्षनेते असल्यानंतर काहीशी मोकळीक मिळते. मनाप्रमाणे दौरे ठरवून फिरता येते. राज्यात हवे त्या ठिकाणी जाता येते. विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस सध्या या भूमिकेतून राज्यात फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com