जे चांगले नाहीत त्यांच्यासाठी "हाऊसफुल्ल' चा बोर्ड - देवेंद्र फडणवीस

जे चांगले नाहीत त्यांच्यासाठी "हाऊसफुल्ल' चा बोर्ड - देवेंद्र फडणवीस

अमरावती : जे चांगले आहेत त्यांना पक्षात घेणार, मात्र जे चांगले नाहीत त्यांच्यासाठी पक्षाकडून हाऊसफुल्लचा बोर्ड असल्याचा उच्चार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. अमरावती येथून त्यांची महाजनादेश यात्रा आजपासून सुरू झाली. फडणवीस यांच्या या यात्रेचा प्रारंभ करताना संरक्षण मंत्री राजनाथसिंह उपस्थित होते. 

अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीतून भाजपच्या महाजनादेश यात्रेला आजपासून सुरुवात झाली. या महाजनादेश यात्रेच्या पहिल्याच सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात भाजप-शिवसेना युती सरकारने केलेल्या कामांची जंत्री मांडतानाच कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. 

महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहोत. जनता मालक असून आम्ही जनतेचे सेवक आहोत असे सांगून ते म्हणाले जनतेचे आशीर्वाद असल्यामुळे आम्ही गेल्या पाच वर्षात दुप्पट-तिप्पट काम करू शकलो. आमच्या सरकारने राज्यात उद्योग आणले. आघाडीने काय काम केलं ? ते त्यांनी सांगावं, असं आव्हान त्यांनी दिले त्याचबरोबर विरोधकांना त्यांनी चर्चेचे खुले आव्हान दिले 

रस्त्याचे जाळे उभारले 
आम्ही गेल्या पाच वर्षात राज्यात 30 हजार किलोमीटर रस्त्याचं जाळं विणलं. हा देशातील विक्रम आहे. दीड लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचं कामही आमच्याच सरकारनं केलं. आता मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं कामही सुरू आहे. शेतकऱ्यांची प्रत्येक योजना आम्ही प्रामाणिकपणे राबवली आहे. त्यामुळे आम्हाला दुष्काळ संपवण्यासाठी महाजनादेश द्या, असं आवाहन फडणवीस यांनी केलं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com