भुजबळसाहेब तुमच्याबरोबरही मी येईन - देवेंद्र फडणवीस

 भुजबळसाहेब तुमच्याबरोबरही मी येईन - देवेंद्र फडणवीस

मुंबई : भुजबळसाहेब काळजी करू नका मी तुमच्यासोबत पुन्हा येईन असा टोला मारत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जोरदार हशा निर्माण केला. विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यावर फडणवीस यांचे अनेक सदस्यांनी अभिनंदन केले त्यात त्यांनी विविध गोष्टी मांडल होत्या तसेच शेरेबाजीही केली होती. 

या सगल्या टिपण्या आणि शेरेबाजीला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात जोरदार प्रत्युत्तर दिले. भुजबळ यांच्या टिपणीला उत्तर देताना व आपल्या भाषणाचा समोरप करताना ते भुजबळांना उद्देशून म्हणाले मी तुमच्याबरोबर येईन. आता राजकारणात काहीही अशक्‍य राहिलेले नाही जर शिवसेना आणि कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येऊ शकतात तर तुमच्या बरोबर येण्यात काय अडचण आहे. जयंत पाटील यांना टोमणा मारताना ते म्हणाले जयंतराव तुम्ही प्रकल्प पूर्ण करा काय सांगावे उद्‌घाटन आपण एकत्र करू. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com