devendra and bhigwan | Sarkarnama

फडणवीसांनी घेतले भिगवणमध्ये कुलदैवताचे दर्शन

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 डिसेंबर 2019

भिगवण : राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भिगवण येथे भिगवण शिक्षण प्रसारक मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी केलेल्या उत्स्फुर्त स्वागताबद्दल फडणवीस यांना आभार व्यक्त केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नीरा नरसिंहपुर येथील कुलदैवताचे दर्शन व इंदापुर तालुक्‍याच्या दौऱ्यानिमित्त विरोधी पक्ष नेतेपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच इंदापुर तालुक्‍यामध्ये आले होते. 

इंदापुर तालुक्‍याचे प्रवेशद्वार असलेल्या भिगवण नगरीमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचे समवेत दौंडचे आमदार राहुल कुल, माजी मंत्री बाळा भेगडे उपस्थित होते. यावेळी भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजित क्षिरसागर यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पुणेरी पगडी, शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी माजी उपसरपंच संजय रायसोनी, प्राचार्य तुषार क्षीरसागर, संस्थेचे पदाधिकारी प्रसाद क्षीरसागर, प्रा. अविनाश गायकवाड,पापा तांबोळी संतोष बिसले, सागर जमदाडे व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी फटाक्‍यांची आतषबाजीही करण्यात आली. 

यावेळी फडणवीस यांनी आस्थेने उपस्थितांची विचारपुस केली व पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. याबाबत अजित क्षिरसागर म्हणाले, इंदापुर तालुक्‍याचे प्रवेशद्वार असलेल्या भिगवण शहरामध्ये राज्यातील मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या सत्काराची परंपरा आहे. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेता म्हणून शपथ घेतल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांचे तालुक्‍यामध्ये प्रथमच आगमण झाले आहे. त्यामुळे त्यांचे यथोचित स्वागत केले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख