नागपुरात महापौर बदलाचे वारे, इच्छुकांची फिल्डींग सुरु

विधानसभा निवडणुकीनंतर आता शहराचा महापौर बदलण्याचे वारे वाहू लागले आहे. नंदा जिचकार यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. केवळ आचारसंहितेमुळे त्यांचा कार्यकाळ लांबला होता. आता डिसेंबरमध्ये नवा महापौर निवडला जाणार असून नंदा जिचकार यांच्या पर्यायावर भाजपने विचार सुरू केल्याची माहीती आहे.
Nanda Jichkar Mayour Nagpur Corporation
Nanda Jichkar Mayour Nagpur Corporation

नागपूर : विधानसभा निवडणुकीनंतर आता शहराचा महापौर बदलण्याचे वारे वाहू लागले आहे. नंदा जिचकार यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. केवळ आचारसंहितेमुळे त्यांचा कार्यकाळ लांबला होता. आता डिसेंबरमध्ये नवा महापौर निवडला जाणार असून नंदा जिचकार यांच्या पर्यायावर भाजपने विचार सुरू केल्याची माहीती आहे.

नंदा जिचकार यांनी मार्च 2017 मध्ये शहराच्या 52 व्या महापौरपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या पदाचा कार्यकाळ आता विधानसभा निवडणूक आटोपली असून राज्यात सरकार स्थिर झाल्यानंतर शहराचा महापौर बदलण्याची प्रकिया वेग घेणार आहे. किंबहुना भाजपमध्ये आतापासूनच नवा महापौर कोण? यावर चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत शहरात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांना दोन जागा गमवाव्या लागल्या. त्यामुळे आलेले अपयश नेमके कशामुळे झाले, यावर पक्षात चिंतन सुरू झाले आहे. 

यातच काहींनी महापौर बदलाचेही सूर छेडले आहे. महापौर नंदा जिचकार यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांचा पर्याय म्हणून पक्ष कुणाला पुढे करणार? याबाबत पक्षात उत्सुकता असल्याचे समजते. काहींनी विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामाचे प्रगतीपुस्तक तयार करण्यासही प्रारंभ केला. महापौरपदासाठी आरक्षणही बदलणार आहे. ही बाब लक्षात घेता सर्वच वर्गातील इच्छुक नगरसेवकांनी आतापासून महापौरपदासाठी 'फिल्डिंग' लावण्यास सुरुवात केली.

महापौर नंदा जिचकार यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली होती. परंतु, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र, त्यांच्या महापौरपदाच्या कार्यकाळाला तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. डिसेंबरमध्ये शहराचा नवा महापौर निवडला जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी महापौर नंदा जिचकार यांच्या एका विदेश वारीमुळे मनपातील पदाधिकाऱ्यांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही उत्तरे देताना नाकीनऊ आले होते. त्यामुळे महापौर बदलण्याच्या हालचालींना वेग आला होता. त्यावेळी महापौरपदासाठी महिलांमधून वर्षा ठाकरे, दिव्या धुरडे, चेतना टांक याची नावे चर्चेत होती. परंतु, नंदा जिचकार यांना पक्षातील दिग्गज नेत्यांचे आशीर्वाद लाभल्याने त्यांना कार्यकाळ पूर्ण करणे शक्‍य झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com