नवी मुंबई पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपचा खोटेपणा उघड

नवी मुंबईत निवडणुकांमुळे भाजप व मविआच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. एकमेकांना श्रेय मिळू नये म्हणून जो-तो आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र या शह-काटशहाच्या नादात थांबवल्या जात असलेल्या कामांमुळे जनता विकासाला मुकत आहे
Development Works Getting Hampered due to Politics in Navi Mumbai
Development Works Getting Hampered due to Politics in Navi Mumbai

नवी मुंबई : मविआकडून महापालिका निवडणुकांआधीच नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण केल्यामुळे मविआ नगरसेवकांच्या विकासकामांना कात्री लावून भाजपकडून राजकीय खेळी खेळली जात आहे.

बुधवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत उद्यान विकसित करण्याचे अनेक प्रस्ताव महापौर जयवंत सुतार यांनी नामंजूर केले. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सपना गावडे आणि अशोक गावडे यांच्या प्रभागातील उद्यानांचा प्रस्ताव येताच सुतार यांनी ते प्रस्ताव नामंजूर करण्याचा प्रयत्न केला.

मात्र वेळीच सपना गावडे व विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी सभागृहात सुतार यांना विरोध केल्यामुळे सपना गावडे यांच्या प्रभागातील एक प्रस्ताव मंजूर, तर दुसरा अखेर नामंजूर करण्यात आला.

मविआने महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे; तर आमदार गणेश नाईकांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही राजकीय पक्षांकडून एकमेकांना मात देण्यासाठी शह-काटशह देण्याचा प्रकार चांगलाच रंगला आहे. नाईकांचे मातब्बर चार नगरसेवक फोडून मविआने भाजपवर पहिली चढाई करण्याची खेळी खेळली आहे.

मविआच्या या राजकीय शहाला मात देण्यासाठी आता भाजप पालिकेतील आपल्या सत्तेचा वापर करू लागली आहे. नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या प्रभागातील बोन्सरी नाल्याच्या विकासाचे प्रस्ताव अडकल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवकांच्या विकासकामांना बगल देण्यास सुरुवात झाली आहे.

बुधवारी सर्वसाधारण सभेत नेरूळ प्रभाग क्रमांक ९८ येथील सेक्‍टर ४० मधील सुमारे दोन कोटी व ४२ मध्ये ३ कोटी रुपये खर्च करून दुसरा उद्यान उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव पटलावर आला होता. मात्र हा प्रस्ताव पुकारताच सुतार यांनी सपना गावडे यांना बोलू न देता दोन्ही प्रस्ताव नामंजूर करण्याच्या बेतात होते; परंतु ही बाब गावडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेत याबाबत सुतार यांना जाब विचारला. या परिस्थितीत विजय चौगुले यांनीही गावडे यांना साथ दिल्यामुळे अखेर सुतार यांनी एक प्रस्ताव मंजूर, तर दुसरा प्रस्ताव नामंजूर केला.


विकासकामांवर परिणाम

निवडणुकांमुळे भाजप व मविआच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. एकमेकांना श्रेय मिळू नये म्हणून जो-तो आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र या शह-काटशहाच्या नादात थांबवल्या जात असलेल्या कामांमुळे जनता विकासाला मुकत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com