तळागाळातील माणसाचा विकास हेच ध्येय - मोहन मते

समाजातील शेवटच्या घटकाचा विकास व्हावा, दलित शोषित पीडितांना न्याय मिळावा आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. बाबासाहेबांचा विचार पुढे नेत भाजपने शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीकरिता प्रयत्न केले. दक्षिण नागपुरातही बाबासाहेबांचा विचार पुढे नेऊन वंचितांना पुढे नेण्यासाठी मी सदैव तत्पर राहील, असे आश्वासन दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार मोहन मते यांनी आज दिले.
तळागाळातील माणसाचा विकास हेच ध्येय - मोहन मते

नागपूर : समाजातील शेवटच्या घटकाचा विकास व्हावा, दलित शोषित पीडितांना न्याय मिळावा आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. बाबासाहेबांचा विचार पुढे नेत भाजपने शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीकरिता प्रयत्न केले. दक्षिण नागपुरातही बाबासाहेबांचा विचार पुढे नेऊन वंचितांना पुढे नेण्यासाठी मी सदैव तत्पर राहील, असे आश्वासन दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार मोहन मते यांनी आज दिले.

मतदारसंघातील प्रभाग 33 मध्ये आयोजित प्रचार यात्रेदरम्यान ते नागरिकांशी संवाद साधत होते. रामेश्वरी चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांनी पदयात्रा सुरू केली. चंदननगर, कुकडे ले-आउट, रामेश्वरी, प्रगतीनगर, अजनी पोलिस स्टेशनच्या मागील भाग मते यांच्या प्रचार रॅलीने आज दुमदुमला होता. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाइं महायुतीचे शेकडो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले. मते यांच्यासोबत भाजपचे माजी नगरसेवक रमेश सिंगारे, बळवंत जिचकार, नगरसेविका वंदना भगत, भारती बुंदे, विशाखा बांते, शिवसेनेचे नेते शेखर सावरबांधे, जनसंपर्कप्रमुख देवेन दस्तुरे, विठ्ठल भेदे, मंडळ अध्यक्ष संजय ठाकरे, विलास करांगळे, प्रशांत कामडे आदी पदाधिकारी होते.

अखिल भारतीय डहरवाल कलार समाजाचे शिष्टमंडळ मोहन मते यांना आज भेटले व त्यांनी मते यांना समर्थन दिले. यावेळी मूलचंद शंभरगडे नरेश उचिबगले, सोहनलाल उचिबगले, संजय बारगवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सावित्रीबाई फुलेनगर येथील बेघर झोपडा समिती, भारतीय लोकमत राष्ट्रवादी पार्टीने मते यांना समर्थन जाहीर केले. पार्टीचे अध्यक्ष पंकज शर्मा, सचिव सतीश तिवारी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com