वळसे पाटलांच्या जंगी विजयासाठी `चेअरमन` फिरतोय अनवाणी!

वळसे पाटलांच्या जंगी विजयासाठी `चेअरमन` फिरतोय अनवाणी!

पारगाव : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी आंबेगाव -शिरुर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील हे विक्रमी मताधिक्क्यासह देदिप्यमान विजय संपादन करुन सातव्यांदा विधासभेला निवडून येपर्यंत चप्पल न घालण्याचा संकल्प केला असुन ते अनवाणी फिरुन  प्रचार करत आहे.

निवडणुका म्हटले की आपल्याला अनेकदा असे पाहायला मिळते एखांद्या नेत्यासाठी त्यांचा कार्यकर्ता तो नेता आमदार अथवा खासदार होईपर्यंत शर्ट घालायचा सोडतो काही जण चप्पल घालायची सोडतात तर काही दाढी वाढवितात.

आंबेगाव- शिरुर विधानसभा मतदारसंघातही हे चित्र पाहायला पाहायला मिळत आहे. परंतु येथे कार्यकर्त्याने नव्हे तर चक्क राष्ट्रवादी कॉग्रेसच्या एका नेत्यानेच म्हणजे देवदत्त निकम यांनी आपले दैवत दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी संकल्प सोडला आहे. वळसे पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजय संपादन करुन विधानसभेत जात नाहीत तोपर्यंत चप्पल घालणार नाही, असा संकल्प त्यांनी केला. गेल्या दहा दिवसांपासुन गावागावात वाड्यावस्त्यावर अनवाणी फिरुन प्रचार करत आहेत. जाहीर सभांतून तडाखेबंद भाषण करुन विरोधकांचे वाभाडे ते काढत आहेत. वळसे पाटील यांना विक्रमी मत्ताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन करत आहेत.

निकम हे तब्बल दहा वर्षे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. त्यामुळे तालुक्यात त्यांची चेअरमन म्हणूनच ओळख आहे. चेअरमनच्या या संकल्पाची सर्वत्र उत्सुकता आहे.

वळसे पाटील हे 2009 मध्ये 36000 आणि 2014 मध्ये 58 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. या पेक्षा अधिक मताधिक्य मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस कामाला लागली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com